Friday, 30 September 2016

कविते तुझ्या सहवासात ....

बहरलोय , उमललोय , दरवळलोय
कविते तुझ्या सहवासात

आर्त वेदनांच्या तीव्रतेने हळहळलोय
अगं तुझ्या सहवासात ..

भावुकतेनी छेडत तारा,
छिन्नविच्छिन्न देहाच्या व्यक्त होतोय
प्रिये तुझ्या सहवासात ...

आसवांच्या स्पर्शही शहारतोय या गालांवर
लाडके तुझ्या सहवासात ...

तुझ्या दुडदुडणाऱ्या पावलांचे
ठसे अंगणात आहेत अजूनही,
तुझ्या सहवासाच्या आठवणीत ...

मातृत्वाचा प्रेमळ हात फिरल्याचे
मनोमन जाणवते ...
वत्सले तुझ्या सहवासात ..

-भार्गव हिरवे

Popular Posts