आर्या काही गात जाता, आर्या काही बरसल्या
शेवटी पापण्या अन आठवणी ओल्या राहिल्या
काही मनातल्या व्यथा मी, अंधारामध्ये दडवल्या
काही कागदावरती माझी कविता बनून राहिल्या
कधी पसरते शाई जराशी आसवांची भेट होता
शब्द जाता सांत्वना, भावना सोबत चालल्या
- भार्गव