नाव सार्थ करायची किमया
तुमच्याच कडून शिकली पाहिजे ...
आज कित्येक आदित्य, प्रकाश
काळोखात स्वत:बरोबर
समाजाला पण ढकलत आहेत ...
अजित अशा प्रतापविरांच्या तलवारी सुद्धा
आज गंजुन गेल्यात ...
खरचं टिळक नावाचा अर्थ समजवायला तरी
तुम्ही आज हवे होतात ...
आमची शस्त्र भंगार झालीत,
आमची मनं कुजून गेली ...
कोणत्याही परिवर्तनाच्या विचारावर
आजकाल आम्ही पोट धरून हसतो
एखाद्या विनोदावर पण कुणी हसणार नाही इतकं
आम्ही इतके आत्मकेंद्रीत झालो
की, वर्तुळानं हेवा करावा ...
मी, माझं आणि शेवटी परत मीच ...
लोकांना कळू द्या, शब्द कसा पाळतात ते
तुम्ही म्हणाला होतात ... स्वराज्य
ते मिळालं तुमच्या प्रत्येक शब्दातून
तुमचे शब्द झाल्या वेदना
जन्म देणार्या बाळंतिणीच्या
आणि जन्म झाला स्वराज्याचा
टिळक तुम्ही चुकलात
हो टिळक तुम्हीच चुकलात ...
तुमच्या शब्दात मंत्रमयता होती
तर का नाही स्वराज्याऐवजी सुराज्य म्हणालात
म्हणाला असतात तर कदाचित
आप्तांकडून तरी आयाबहिणींची विटंबना झाली नसती
दूषण आपल्याला देतोय,
कारण बाकीचे कान, डोळे, तोंडावर
हात ठेवून बसलेत ...
अशा मुर्खाकडून कसली आपेक्षा करणार ...
टिळक ....
आज आम्ही इतके सेक्युलर झालो की ,
कपाळावर तिलक करायची पण आम्हाला लाज वाटते
बरं झाल बळवंतराव
स्वातंत्र्य मिळायच्या आधीच गेलात
तुम्हाला सहन झाले नसते
आप्तांनी केलेले देशाचे तुकडे
कदाचित तुम्ही हे होऊच दिल नसतं
पण शक्यता कमीच होती ...
अहिंसेच पिक घेणाऱ्यांनी
स्वैराचाराला खतपाणी घालायचे
कुटिल उद्योग आरंभले होते ...
तुम्ही गेलात,
स्वातंत्र्याच धगधगत कुंड पेटवून
त्यातली तेजस्वी समिधा झालात
बरंच झालं गेलात ते ...
नाहीतर तुम्हाला सुद्धा प्रायोपवेषण करून
देह त्याग करावा लागला असता
तुमच्या तेजातून निर्माण झालेल्या
स्वातंत्र्याच्या सुर्यासारखा...
- भार्गव हिरवे

No comments:
Post a Comment