नको मजला धर्म अन, नको मजला जातही
हिमालयाच्या हिमशिखरावर आक्रंदते का भारती
हिमालयाच्या हिमशिखरावर आक्रंदते का भारती
फेसाळला का सिंधू - सागर, फुरफुरल्या का मशाली
जळणाऱ्या अग्निजिव्हा का इथे अश्रूत न्हाती
या तरूंवर कोण पक्षी, मंजुळ स्वरे आरविती
पैलतोगे काऊ जिथे देतसे पाहुण्यांची वर्दी
का म्हणून एकमेका हिन सारे लेखति ?
माणसाने माणुसकीशी नाळ केंव्हा तोडली ?
मीपणाच्या कुबड्याच मित्रा, जाती या अन धर्मही
लडखडो वा धडपडो तरी मी वाट माझी चालली
हीच माझी आज्ञा अन हीच अंतिम इच्छाही
न द्या मला संस्कारशिक्षा, जळण्याची वा पुरण्याची
ती असावी पहाट सुंदर, इच्छा वसली मानसी
दिसावेत या नभी निळसर, चंद्र- सूर्य संगती
राम- रहीम- बुद्ध यांची जिथे, एकमेकांत वसती
नजर करावी नजर प्रभो, हे पाहण्याची दिव्यदृष्टी
कित्येक इच्छा मनास माझ्या दिवसागणिक दंशती
मी शोधतो स्वतःत शेवटी, भालचंद्र व्योमकेशी
- भार्गव हिरवे
No comments:
Post a Comment