कुजणाऱ्यांनो बुजणाऱ्यांनो
का बरं कुजबुजता ?
आपल्या सडक्या विचारांची
घाण का पसरवता ?
ठरतो कसा कोणी देशद्रोही
वंदे मातरम न म्हटल्याने ?
अन कशी आजमावणार निष्ठा
वंदे मातरम म्हटल्याने ?
येतो भारीच पुळका यांना
समाजविघातक वृत्तीचा
घेतलाय काहींनी ठेका आता
समाजाच्या सुधारणेचा
दररोज शब्दबंबाळ भिंती
होतात निळ्या रंगाच्या
रंगांनाही असतो रंग
इथे प्रत्येक धर्माचा
तो अमक्या नि हा तमक्या
अन मी खमक्या जातीचा
येतो आता उबग यांच्या
स्वार्थलोलुप वृत्तीचा
बाटला ना रे धर्म माझा
त्याच्या झालेल्या स्पर्शाने
बाटवला मी कुलाचार त्यांचा
माझ्या अस्वच्छ स्पर्शाने
नीती नियम विचार सारे
अविचाराने सोडा रे
प्रार्थना आता करता रे कसली ?
धरा बिभत्सतेचा ठेका रे
नको वैचारिक गुलामगिरी
नको विचारधारा रे
करून टाकू राख तयांची
मानवतेच्या स्पर्शाने
वृथा नको हेटाळणीही
विज्ञानधिष्ठित ज्ञानाची
करा चिकित्सा धर्माचीही
आदरपूर्वक सन्माने
काल त्यांनी केला हल्ला
आमचा माणूस मेला रे
आपणही करून हल्ला
घेऊ त्याचा बदला रे
हळहळतो जीव माझा
जेंव्हा माणूस मरतो रे
विचारधारांचे लावून लोणी
स्मशानात उरते राख रे
- भार्गव हिरवे
का बरं कुजबुजता ?
आपल्या सडक्या विचारांची
घाण का पसरवता ?
ठरतो कसा कोणी देशद्रोही
वंदे मातरम न म्हटल्याने ?
अन कशी आजमावणार निष्ठा
वंदे मातरम म्हटल्याने ?
येतो भारीच पुळका यांना
समाजविघातक वृत्तीचा
घेतलाय काहींनी ठेका आता
समाजाच्या सुधारणेचा
दररोज शब्दबंबाळ भिंती
होतात निळ्या रंगाच्या
रंगांनाही असतो रंग
इथे प्रत्येक धर्माचा
तो अमक्या नि हा तमक्या
अन मी खमक्या जातीचा
येतो आता उबग यांच्या
स्वार्थलोलुप वृत्तीचा
बाटला ना रे धर्म माझा
त्याच्या झालेल्या स्पर्शाने
बाटवला मी कुलाचार त्यांचा
माझ्या अस्वच्छ स्पर्शाने
नीती नियम विचार सारे
अविचाराने सोडा रे
प्रार्थना आता करता रे कसली ?
धरा बिभत्सतेचा ठेका रे
नको वैचारिक गुलामगिरी
नको विचारधारा रे
करून टाकू राख तयांची
मानवतेच्या स्पर्शाने
वृथा नको हेटाळणीही
विज्ञानधिष्ठित ज्ञानाची
करा चिकित्सा धर्माचीही
आदरपूर्वक सन्माने
काल त्यांनी केला हल्ला
आमचा माणूस मेला रे
आपणही करून हल्ला
घेऊ त्याचा बदला रे
हळहळतो जीव माझा
जेंव्हा माणूस मरतो रे
विचारधारांचे लावून लोणी
स्मशानात उरते राख रे
- भार्गव हिरवे
No comments:
Post a Comment