Tuesday, 19 September 2017

इच्छा ...

पहावा पदन्यास मोरांचा,
ऐकावी तान कोकिळेची
घ्यावा गंध मातीचा,
असावी झोळी शब्दांची

व्हावे फकीर कोठे मी,
व्हावे कोठे सन्यासी
नेसावी छाटी कोठे मी,
कुठे कफनीही नेसावी

मशिदीत आता मी,
माझी मान झुकवावी
देवालयात असतांना
प्रचिती समाधीची यावी

दिसावा पीर पैगंबर
दिसावा विष्णू शेषशायी
दिसावा रंग रक्ताचा
अन एकच हास्यमुद्राही

- भार्गव

No comments:

Post a Comment

Popular Posts