ऊन, पाऊस, वारा अन गारा
त्यावर धुळीची शाल पांघरून
प्रत्येक चौकाचौकातून उभं राहून
आता पाय थकलेत आमचे ...
आठवण मनात नाही,
तुम्ही आम्हाला मानत नाही
राजकारणाच्या पटांवरची
मोहरी झालोय आम्ही आता
एकमेकांच्या विचारांचा
कधी परस्पर विरोधी मतं असूनही
माणूस म्हणून आदर ठेवणारे
आम्ही ब्रॉन्झच्या पुतळ्यातुन
आता एकमेकांवर वार करतोय
काय शक्कल लढवून
माणसा माणसात लावता भांडण
आणि सामान्य माणूसही झालाय मुर्ख
न वाचता एकही शब्द ...
पुतळ्यांची भाषा फक्त जाणणाऱ्या
धूर्त कोल्ह्यांवर ठेवतोय आंधळा विश्वास ...
© भार्गव हिरवे
त्यावर धुळीची शाल पांघरून
प्रत्येक चौकाचौकातून उभं राहून
आता पाय थकलेत आमचे ...
आठवण मनात नाही,
तुम्ही आम्हाला मानत नाही
राजकारणाच्या पटांवरची
मोहरी झालोय आम्ही आता
एकमेकांच्या विचारांचा
कधी परस्पर विरोधी मतं असूनही
माणूस म्हणून आदर ठेवणारे
आम्ही ब्रॉन्झच्या पुतळ्यातुन
आता एकमेकांवर वार करतोय
काय शक्कल लढवून
माणसा माणसात लावता भांडण
आणि सामान्य माणूसही झालाय मुर्ख
न वाचता एकही शब्द ...
पुतळ्यांची भाषा फक्त जाणणाऱ्या
धूर्त कोल्ह्यांवर ठेवतोय आंधळा विश्वास ...
© भार्गव हिरवे
No comments:
Post a Comment