Monday, 4 September 2017

YZ मराठी चित्रपट


मराठी चित्रपटांची कौतुकानी पाठ थोपटणं हे आता सुरु व्हायला हवं. तसं पाहिलं तर मराठी रसिक ते नेहमीच करतो यात वेगळ काही सांगायला नको. पण हिंदी चित्रपटातून कोणतीही कथा विकृत स्वरूपात मांडली जात असतांना संस्कृती आणि सामजिक मुल्यांच भान राखत तरुणांना आवडेल असा एखादा चित्रपट तयार करणं हे फ़क्त मराठी चित्रपट सृष्टीच करू शकते. हे परत एकदा yz च्या टीम नी दाखवून दिलं.

चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार साईड रोलमधे ( ज्यांची नावं लोकांच्या तोंडात नेहमी असतात असे सई ताम्हणकर, मुक्ता बर्वे ) आहेत. पण मास्तरांची आणि बत्तीस नावाच्या त्यांच्या विद्यार्थ्याची भूमिका अफलातून आहे. त्यांची मैत्री, त्यातून घडणारे बदल. वाईच्या कुलकर्णी सरांची नंतर त्यांच्या मावस बहिणीच्या मैत्रिणीशी अंतरा नावाच्या पात्राशी झालेली ओळख, त्यांची केमिस्ट्री, आपल्या लहानपणीच्या मैत्रिणीची एक्सीडेंटली झालेली भेट. त्यातून शेवटी तीच लग्न लाऊन देण. आणि शेवटी स्वत:च्या निर्णयांवर ठाम रहात लहानपणी पाहिलेल्या स्वप्नांना जगण्यासाठी मास्तर निघतात. या ठिकाणी शेवट.
अडीच तास माणूस पुर्णवेळ चित्रपटात हरवून जातो. यात कुठेही नात्यांचा अवमान, आपली मर्यादा सोडून केलेलं वर्तन, विद्यार्थी दोस्तासोबत बिड्या शेजावित बसलेले मास्तर दाखवलेले नाहित. कोणत्याच प्रकारचं गलिच्छ संगीत चित्रपटातून दिसत नाही.
अंतरा या पात्रानी मास्तरांना दिलेलं प्रेमपत्र प्रेक्षकांनी वाचल्यावर एक गोष्ट कळते ती म्हणजे चित्रपटाचा निर्मात्यानी आणि लेखकानी केलेला आभ्यास.उत्तम दिग्दर्शनाचा प्रत्यय पण जाणत्या माणसाला आल्यावाचून रहाणार नाही. प्रत्येकानी जरुर पहावा असा चित्रपट.

©भार्गव हिरवे



No comments:

Post a Comment

Popular Posts