जळण्याचे वरदान घेऊन जळते आहे
चराचराला ज्योत प्रकाशित करते आहे
उलगडायला लागल्यात भावना हल्ली
व्यक्त अव्यक्ताचे कोडे मन सोडवते आहे
कैक रात्री उजळल्या आठवणीत तुझ्या
दिवस रात्रीची वाट पाहण्यात जातो आहे
रंगलेल्या तुझ्या मैफिलीला नाही सुगावा
गायलेल्या भावना तू माझ्याच आहेत
हृदयातील स्पंदने जेंव्हा शब्द होती
प्रत्येक श्वास अभिमंत्रित आर्या आहे
©भार्गव
चराचराला ज्योत प्रकाशित करते आहे
उलगडायला लागल्यात भावना हल्ली
व्यक्त अव्यक्ताचे कोडे मन सोडवते आहे
कैक रात्री उजळल्या आठवणीत तुझ्या
दिवस रात्रीची वाट पाहण्यात जातो आहे
रंगलेल्या तुझ्या मैफिलीला नाही सुगावा
गायलेल्या भावना तू माझ्याच आहेत
हृदयातील स्पंदने जेंव्हा शब्द होती
प्रत्येक श्वास अभिमंत्रित आर्या आहे
©भार्गव
No comments:
Post a Comment