Monday, 4 September 2017

सृजन ...

नाते तिचे नि त्याचे जणू बंध रेशमाचे
डोळ्यातल्या सरींना वेध पावसाचे ...

एकाच क्षणासाठी आतुर ही धरित्री
द्वैतातुनी फुलावे क्षण अद्वैताचे ...

सर्वदूर दरवळावा परिमल मिलनाचा
साजरे करू महोत्सव फुलणाऱ्या अंकुराचे ...

©भार्गव

No comments:

Post a Comment

Popular Posts