Friday, 15 September 2017

झाले रिते आकाश सारे ...

झाले रिते आकाश सारे, गेल्या कुठे चांदण्या ?
शोधण्या चंद्र घरात बघता, त्या साडीवर दिसू लागल्या ...

काय अधिकार त्यांचा, बिलगल्या जाऊन तिला 
तक्रार घेऊन गोपी जणू, यशोदेकडे धावल्या ...

हाय आता काय ही वेळ यांनी आणली 
रुसल्या तिला मनवण्याच्या क्लुप्त्या कुणी सांगेल का ?

पुन्हा होऊन बाल मी, लटके जरा बोलेलही 
काय ती ललाट माझे, उचलुनी चुंबेल का ?

थांबा जरासे तुम्ही, बोलायचे आहे मला 
खबरदार ! जर याल घेऊन तक्रार येथे पुन्हा 

रागावलो ... आता जवळ माझ्या सख्या राहतील का ?
की पुन्हा आयुष्य माझे अंधारून येईल का ?

मजला हवेत सारेच भोवती, चंद्रही अन चांदण्याही
नावडते मज पौर्णिमा अन  नको मज अमावस्याही ...

- भार्गव हिरवे 

No comments:

Post a Comment

Popular Posts