Friday, 15 September 2017

आयुष्य ...

खरंच सांगतो आयुष्य सोप्पं आहे
चॅलेंज घेऊन जगण्यात थ्रिल आहे

मुठीतुन वाळू सगळी निसटल्यावर
मूठ गच्च आवळण्यात जिद्द आहे

चेहऱ्यावरती नेहमी मंद स्मित असावं
येणाऱ्या प्रत्येक क्षणाचं स्वागत आहे

शांततेतही मन असंकाही रमून जावं
मग येणारा हुंकारही कविता आहे

©भार्गव हिरवे 

No comments:

Post a Comment

Popular Posts