Thursday, 14 September 2017

नाते ...

व्योम चुम्बण्याला फांदी जशी निघाली 
जाणीवही मुळांची मुळांपरी रुजावी 

संस्कार खोल केले मातीने जयांवर
आपसूक नजर त्यांची मातीकडे वळावी 

शब्दन् शब्द व्हावा सरी पावसाच्या 
मातीतून सुगंधी कविता जशी फुलावी 

वाफाळल्या चहावर फुंकर घातल्यावर 
 क्षणभर ऐनकाची नजर धुंद व्हावी 

बहरून क्षण यावे, रोमांचही फुलावे 
लाजाळूपरी तरीही पापण्यांनी मिटावे 

नाते असे असावे, नाते कसे असावे 
नकळत  वेलीवर जसे प्राजक्ताने फुलावे

- भार्गव हिरवे 



 

 
  


  

No comments:

Post a Comment

Popular Posts