कुणीतरी ओरडलं ...
भूकंप... भूकंप... भूकंप...
ऐकूनच हादरली धरित्री
घाबरली, सैरभैर झाली
आपल्या पिल्लांना पंखाखाली घेणार्या
पक्ष्यांसारखी
करत होती अनाठायी प्रयत्न
धडपडत होती माणसाला कवेत घेण्यासाठी
वाचवू पाहात होती
तिच्या लेकरांनी वर्षानुवर्षे वेचून उभं केलेल
पत्त्यांच क्षणिक साम्राज्य
ईच्छा एकच होती ....
लेकरांना ईजा होऊ नये
शेवटी नियतीसमोर हतबल झाली
क्रौर्याच्या शृंखलात जायबंदी
घेऊन माणसांच कलेवर
दगडांच्या सचेतन ह्रदयावर
धाय मोकलून रड़ू लागली
पण अजून ...
दैव घाला घालतच होतं
आक्रोश कुणी ऐकलाच नाही
शेवटी अश्रू आटले ...
आणि परत एक ...
असंख्य माणसांच थडग झाल
निर्मनुष्य, नीरव, खडकाळ माळरान ...
©भार्गव हिरवे
No comments:
Post a Comment