चिऊ कोकिळा दळतील दाणी
कबुतर भरेल घरचे पाणी
आपण ऐकू गोष्टी, गाऊ गाणी
पाहुण्यांची देईल कावळा वर्दी
पेरुनी पोपटाला झाली सर्दी
खारुताई पळाली झाडावरती
माकडांची बाजूला भाऊगर्दी
कुणी ससुला गवतावरती
कासव नव्हते अवती भोवती
चल ना दादा, जाऊन येऊ
अंगणातल्या आंब्याच्या झाडावरती
हरवली का रे गर्द सावली
चहूकडे इमारतींची वस्ती
गर्द हिरव्याशा झाडाला अजुनी
आम्र आठव फळे लगडली
- भार्गव
कबुतर भरेल घरचे पाणी
आपण ऐकू गोष्टी, गाऊ गाणी
पाहुण्यांची देईल कावळा वर्दी
पेरुनी पोपटाला झाली सर्दी
खारुताई पळाली झाडावरती
माकडांची बाजूला भाऊगर्दी
कुणी ससुला गवतावरती
कासव नव्हते अवती भोवती
चल ना दादा, जाऊन येऊ
अंगणातल्या आंब्याच्या झाडावरती
हरवली का रे गर्द सावली
चहूकडे इमारतींची वस्ती
गर्द हिरव्याशा झाडाला अजुनी
आम्र आठव फळे लगडली
- भार्गव
No comments:
Post a Comment