Wednesday, 27 September 2017

अशांत ...

बुडता बुडता उरतील मागे शब्द माझे जशी तुकयाची गाथा त्रि - खंडात गाजे शब्दांचा हृदयातून पाझर फुटतो जेंव्हा कागदावरची शाईसुद्धा मज गंगा भासे सायंकाळी जेंव्हा खग आकाशात उडती वाटते मलाही आकाशी झेपावत जावे कधी आकृष्ट करती जेंव्हा मज पर्वतराजी मन कोसळणाऱ्या जलधारेसंगे दरीत धावे नितळ आकाशाने बघता स्वबिंब दर्यामधे त्यातही त्याला माझे आधी रूप दिसावे साश्रु नयने घेऊन जाणाऱ्या ढगांस काळ्या धरेकडे बघून आठवणीत माझ्या रडू कोसळावे मन विदीर्ण होऊन पुर्णविरामात स्थिर व्हावे एका ठिपक्याने जणू वाक्य परिपूर्ण व्हावे ©भार्गव हिरवे

No comments:

Post a Comment

Popular Posts