Saturday, 30 September 2017

आणि दसरा साजरा झाला ...

चला मेगापोलीस ... लास्ट स्टॉप  ...
कर्रर्र ... ब्रेक चा आवाज झाला. पुण्यात आल्यापासून माझ्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग बनलेली PMPL बस थांबली. सगळी बस अगदी रिकामी होती. अगदी 3-४ प्रवासी होते. एक एक उतरत होता. कन्डक्टर साहेब पैसे मोजत  होते. मी त्यांच्याजवळ जावून थांबलो होतो.



- काय झालं काही पैसे द्यायचे उरलेत का ? तिकीट दाखवा असं ते म्हणाले.
- मी नाही म्हणत हातमिळवणी करण्यासाठी  हात पुढे केला. थोडंसं आश्चर्यानी माझ्याकडे पहात त्यांनी हात मिळवला. मग मी त्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या तेही अगदी खुल्या मनानी हसले.
- हेच मी बस ड्रायव्हरलासुद्धा म्हटलं, त्यांनी म्हटलेलं "अरे वा !" मध्ये त्यांना झालेला आनंद दिसला.समोरून येणाऱ्या एका कारच्या उजेडात त्याचा हसरा चेहरा दिसला 
- दिवसभर गाडी चालवून थकलेले हात, दक्षपणे गाडी चालवून थकलेली नजर काही क्षण का होईना पुन्हा ताजीतवानी झाल्याचा फील घेऊन मीही बाहेर पडलो.

खरचं आपण सणासुदीला झकपक कपडे घालून बाहेर जातो सण साजरा करतो ते बऱ्याचदा या सगळ्या लोकांच्या जीवावर, ते सणाच्या दिवशीही काम करत असतात त्यामुळे आपण आपले सण आनंदानी आणि उत्साहानी साजरे करू शकतो.
तेंव्हा आजच्या दिवशी, सगळ्या कंडक्टर आणि ड्रायव्हर साहेबांसारख्या आपलं आपलं कर्तव्य बजावणाऱ्या सर्वांना #ThankYou  आणि आपल्या सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा ...

© भार्गव हिरवे 

No comments:

Post a Comment

Popular Posts