दुडदुडणारी पावलं,
घराच्या आंगणात आजही दिसतात ..
त्यांचे उमटलेले ठसे,
आईबाबांना आजही आठवतात ..
नेहमीच सांगतात ते हल्ली,
लहानपण माझं ..
गडबडीत पळत जाऊन
पकडलेल त्यांचं बोटही दाखवतात ..
हे सारं ऐकल्यावर,
माझी मलाच गंमत वाटते ..
कालच बालसुलभ वागणं,
आज बालिशपणाच वाटतंय ..
आता जेंव्हा तुझ्याकडे पहातो,
आईबाबांच मन मला कळतंय ..
खरंच, कित्ती सुंदर आहेस !
प्रत्येकवेळी माझ्याशी छान छान
कधी हसून, कधी रुसून,
कधी स्पष्ट, तर कधी बोबड बोबड बोलतेस ..
हो, तू आहेसच निरागस,
हृदयात मीही जपलेत,
तुझ्या आठवांचे ठसे खोलवर
आईबाबांसारखेच,
माझ्या लाडक्या कविते ...
- भार्गव
No comments:
Post a Comment