Tuesday, 16 April 2019

आयुष्याच्या काठावर ..

किनाऱ्यावरुनी धुंद धुंद वाहतांना
अलगद स्पर्शुनी गेला आकाशी सूर्य कलतांना...

लाजाळू परी काल लाजली होती
हलकेच  गालावर श्वासांचा स्पर्श होतांना...

धुमसत होता वन्ही मनामनातून काल
मन विदीर्ण झाले होते चिता तिची जळतांना ...

भोग कधी बरे सांग संपला माझा ?
मी भोग भोगण्या आलो आईशी नाळ तुटतांना ...

संपू दे ही भयाण स्वप्ने आणि या भयावह रात्री
नव्या आशेसह आता नवी पहाट उजाडताना ... 

- भार्गव

No comments:

Post a Comment

Popular Posts